Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Monday, December 27, 2021

संवाद

राणी तुझ्या हट्टा पुढे मला
शरणागती पत्करायलाच हवी.
मला माहित आहे.नाहीतर 
तू तुलाच स्वतःला त्रास करून घेणार
गप बसून न बोलता तू 
तुझी रोजची सगळी कामं व्यवस्थित 
न बोलता पार पाडणार
तुझ गप बसणं हिच खूप 
मोठी शिक्षा असते ग आणि 
तिचं शांतता मला सहन होत नाही.
बोल तुझे काय म्हणणे आहे.
ऐकायला मी तयार आहे.
तुझ्या हट्टी स्वभावा पुढे
संवादाची पताका फडकावतो.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time