तुझ्या प्रेमात पडले
होत नव्हतं ते सगळं
तुला बहाल केलं.
प्रत्येक वेळी तुझी चुक
मी पोटात घालत गेले.
तुझ्या पाठीशी खंबीरपणे
उभी राहात गेले.
आता माझीच सहनशक्ती
संपली रे
थकून गेले तुला समजावून
सांगून.
मी आता कसा दुजोरा देऊ?
माझ्याकडे आता काहीच नाही.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .