Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Sunday, January 02, 2022

दुजोरा देऊ

कसा रे मी दुजोरा देऊ
आपल्या प्रेमाला
सर्वच तर तुला अर्पण केल.
माझं हृदय ❤️ ही तुला दिलं
बघ डोकावून त्यात 
तुझच राज्य दिसेल
स्वप्न ही तुझेच बघते
बघ माझ्या डोळ्यात
तुझीच प्रतिमा दिसेल
या गुलाबी ओठांवर
तुझाच हक्क आहे.
माझे सर्वस्व तुलाच अर्पण केले.
मी माझी नाहीच राहिले
तुला आत्मसात करून
तुझीच तर झाले.
तुझ्यात मिसळून एकजीव झाल्यावर
स्वतःकडे आता काय ठेवू
दुजोरा तो आता काय देऊ.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time