Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Sunday, January 16, 2022

तिचा संघर्ष

तिच लग्न झालं ती खूप खुश होती.
आयुष्यात प्रेम करणार समजून घेणार
लाड कौतुक हट्ट पुरवणारे हक्काचं
माणूस मिळालं.
थोड्याच दिवसात तिच्या समोर 
त्यांच खरं रूप यायला लागल.
तिच्या भावनाचा चोळामोळा झाला.
आपल कर्तव्य आहे नवऱ्याला या सर्व
परिस्थितीतून बाहेर काढून जगाच्या व नातेवाईकांचा समोर त्याला असलं कोहिनूर हिरा बनवून दाखवायचं व त्याचा मान सन्मान त्याला परत मिळवून द्यायचा.
असं म्हणून जणू काही तिने स्वतःसाठी स्वतःचं वचन घेतलं.
स्वतःच्या इच्छावर पाणी सोडून 
ती अर्धांगिनी म्हणून आपल्या कर्तव्यासाठी व संघर्षासाठी तयार झाली.
तिला माहित होतं या सर्व परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागणार आहे.त्या साठी कोणतीही परिस्थिती आली तरी तिला डगमगून चालणार नाही.
स्वाभिमानी होती त्यामुळे तिने कोणाचा आधार घेतला नाही.
संघर्ष करत व कर्तव्य करत
वयाचा संपूर्ण उमेदीचा काळ, गोडगुलाबी स्वप्न, इच्छा आकांक्षाचा चुराडा करून
तिने तिचे ध्येय गाठले.आणि त्याला सर्व परिस्थितितून बाहेर काढून जगाच्या समोर आकर्षित चकचकीत कोहिनूर हिरा बनवून दाखवला.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time