Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Thursday, January 13, 2022

प्रेमाच्या आठवणी

राणी तुझ्या माझ्या त्या जुन्या
प्रेमात रमणे खूप छान वाटत
तू दिलेल्या चाफ्याच्या फुलांचा
तो सुकलेल्या सुगंध 
अजून ही ताजा वाटतो.
तू दिलेलं ग्रीटिंग कार्ड जुनं झालं
पण त्यातील तू सुवर्ण अक्षरात
लिहिललेली कविता अजून ही
मनाला भावते.
एका नजरेची ती आपली पहिली भेट
तुझ्या माझ्या आयुष्यातील 
ती संध्याकाळ
रोजच नजरेतून पाहणं 
त्या नजरेत रमून जाण
नव्या पिढीच नवं नवं ऊतू आलेलं प्रेम
आपलं शांत सोज्वळ जुनंच प्रेम छान होत.
आता तू दिसत ही नाही
आपली भेट ही आता होत नाही.
तरी ही तसंच आहे ग तुझं माझं ते प्रेम
तुझ्या माझ्या प्रेमाच्या जुन्या आठवणी
तू दिलेल्या चाफ्याच्या सुगंधी
फुला सारख्या ताज्या टवटवीत 
माझ्या मनाच्या कोपऱ्यात
माझ्या हृदयाच्या कुपीत बंद करून
जपून ठेवल्या आहेत.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time