Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Tuesday, January 18, 2022

मैत्रीच नात

नाते आपले खऱ्या मैत्रीचे 
विश्वासाने जपू या
एकमेकांना साथ देत
शेवटच्या क्षणापर्यंत ठेवू या
आपल्या नात्यात अविश्वासचे
काही क्षण येतील
कोणी जाईल सांगून
आपल्यात फुट पाडण्यासाठी
तडे आपल्यात करतील निर्माण
मन आपलं दुखवून न देता.
एकमेकांशी बोलून गैरसमज 
दूर करु या.
आपली मैत्री तोडण्यात
किती येवोत संकटं
आपलं मैत्रीच नात 
अजून घट्ट करून 
मैत्रीच नात आपल 
असंच अनंत ठेवू या.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Monday, January 17, 2022

आशेचा किरण {अलक कथा}

पक्षी उडतो पंखाच्या जोरावर
ती जगते आशेच्या किरणावर
तो एक दिवस येईल ह्या स्वप्नांच्या
एकाच आशेच्या किरणावर ती जगत होती. प्रेमाचे दिवस संपले होते.
फक्त आणि फक्त समजून घेणार जवळचा मित्र व्हावा एवढीच तिची अपेक्षा होती.
कधीतरी भेटेल मला जाणून तर घेईल.
मला समजून तर घेईल.
तिला आता त्यांचा कडून कसलीच अपेक्षा नव्हती. फक्त एक चांगला मित्र म्हणून
त्यांने तिला साथ द्यावी हिच एक इच्छा होती.
ती त्याला वेड्या सारखी साद घालायची
त्यांच्या साठी कविता करायची.
त्या कवितेतून त्याच कडे आपलं मन व्यक्त करायची. आणि म्हणायची
माझ्या जीवनात जीव असे पर्यंत
साथ सोबत तुझीच सतत राहू दे.
अपेक्षा काहीच नाही  रे वेडू
कापरा आवाज ओळखून घे.
नयनी अश्रूंना समजून घे.
सुखदुःख माझे वाटून घे.
तुझ्या मैत्रीच्या छायेत 
मला थोडीशी जागा दे.
या एकाच आशेच्या किरणावर 
ती जगत होती.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time