Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Thursday, September 30, 2021

ऐकशील का

काहीतरी करावं असं म्हणतोय
मी तुझ्यावर प्रेम करणारा तुझा वेडू
तुझ्या साठी काही तरी करावं 
म्हणतोय.
जपून ठेवलेलं सर्व प्रेम तुला अर्पण
करावं म्हणतोय.
तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा गोड हास्य आणावं म्हणतोय.
तुझ्या नजरेत पुन्हा चमक दिसावी
म्हणतोय.
तू पुन्हा पूर्वीसारखी नाचावी बागडावी 
म्हणतोय.
तू पुन्हा पूर्वीसारख नवनवीन पदार्थ करून खायला घालावे म्हणतोय.
आता तू स्वतःसाठी जगावं म्हणतोय.
तुझी राहिलेली स्वप्न पूर्ण करावी
म्हणतोय.
सगळ्यांसाठी सगळं केलं 
आयुष्य बरंच सरून गेलं
उरलं आयुष्य आनंदाने घालवावे.
दुःख थोडं सोडून बाजूला करून
स्वतःसाठी आनंदाने जगावे.
करशील ना माझ्या साठी एवढं
तुझ्या स्वप्नातील तुझा प्रेम वेडू 
ऐकशील ना त्यांच एवढं.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️


7 comments:

  1. अप्रतिम लिहिलंयस 👌👌👌

    ReplyDelete
  2. अप्रतिम खूप खूप सुंदर 👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  3. अप्रतिम शब्दगुंफण मॅडम!✍️������

    ReplyDelete
  4. अप्रतिम लिहिलय मॅम

    ReplyDelete
  5. अप्रतिम रचना...👌👍✍️🍫🌹

    ReplyDelete
  6. खूप खूप सुंदर 👌👌

    ReplyDelete
  7. खूप सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time