मी तुझ्यावर प्रेम करणारा तुझा वेडू
तुझ्या साठी काही तरी करावं
म्हणतोय.
जपून ठेवलेलं सर्व प्रेम तुला अर्पण
करावं म्हणतोय.
तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा गोड हास्य आणावं म्हणतोय.
तुझ्या नजरेत पुन्हा चमक दिसावी
म्हणतोय.
तू पुन्हा पूर्वीसारखी नाचावी बागडावी
म्हणतोय.
तू पुन्हा पूर्वीसारख नवनवीन पदार्थ करून खायला घालावे म्हणतोय.
आता तू स्वतःसाठी जगावं म्हणतोय.
तुझी राहिलेली स्वप्न पूर्ण करावी
म्हणतोय.
सगळ्यांसाठी सगळं केलं
आयुष्य बरंच सरून गेलं
उरलं आयुष्य आनंदाने घालवावे.
दुःख थोडं सोडून बाजूला करून
स्वतःसाठी आनंदाने जगावे.
करशील ना माझ्या साठी एवढं
तुझ्या स्वप्नातील तुझा प्रेम वेडू
ऐकशील ना त्यांच एवढं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
अप्रतिम लिहिलंयस 👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम खूप खूप सुंदर 👌👌👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम शब्दगुंफण मॅडम!✍️������
ReplyDeleteअप्रतिम लिहिलय मॅम
ReplyDeleteअप्रतिम रचना...👌👍✍️🍫🌹
ReplyDeleteखूप खूप सुंदर 👌👌
ReplyDeleteखूप सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDelete